आयुष्याच्या वळणावर
आठवण तुझी येतं राहील,
सोबत नसले तरी तुझ्या
तरी हृदयात कायम राहील.
आयुष्याच्या वाटेवर
देशील का हात हाती,
काय भरोसा या जीवनाचा
तुझा हात घेते हाती
आयुष्याचा हा प्रवास सारा
कधी चुकला कुणाला,
कोण भेटून जाईल इथे
सांगू तरी कुणाला
आयुष्याची सुरुवात
करते तुझ्या संगतीने,
देशील का साथ तुझी
मला आयुष्य जगतांना
स्वाती नानासाहेब जाधव,
लासूरगाव, ता. वैजापूर