साथ मराठी कविता Marathi Kavita, Poem

सौ. प्रिती सुरज भालेराव लिखित मराठी कविता साथ यामध्ये आपल्या जोडीदाराची साथ कशी असावी याचे वर्णन केले आहे

साथ मराठी कविता Marathi Kavita, Poem

दिवसरात्र माझ्या मनात 
विचार तुझाच रे असतो
माझ्या वागण्याचा मात्र
तुझ्यावर परिणाम होत नसतो

कुणाला कितीही जीव लावला
समोरच्याला त्याचं काहीच नसतं
कुणासाठी कितीही केलं आपण
समोरच्याला कमीच पडत असत

आयुष्याच्या वाटेवर मला
फक्त साथ तुझीच हवी रे
जग दुनिया मतलबी हे सारे
करती प्रेमाचा फक्त देखावा रे

मरणानंतर माझ्या सख्या रे
आठवण माझी काढशील का?
अल्लड आहे मी अजुनी थोडी
मला तू समजून घेशील का?

दुःख वाटून तू माझे सारे
अलगद् कवेत घेशील का?
जास्त नको काहीच मला
थोडस समजून घेशील का?

सौ. प्रिती भालेराव, पुणे