सहारा मराठी कविता Marathi Kavita, Poem

सोनाली रामलाल रसाळ लिखित मराठी कविता सहारा

सहारा मराठी कविता Marathi Kavita, Poem

एक प्रतिबिंब पाहिले 
भावनेच्या तळाशी
भेदरलेली मने रुतली 
होती खोल गळाशी

दुःख यातना भोगल्या
तरी सुख नाही शेवटी
गजबजलेला गाव सगळा 
तरी मी होते एकटी

शुन्य भर मी हसले 
अन् पुन्हा तीच रडकथा
माझासारख्या सख्या माझ्या 
त्यांची पण हीच व्यथा

घेतलेला मोकळा एक श्वास 
अन् देहाचा सोनेरी पिंजरा
तणाव आयुष्यात असतांना
रोज करते मी उत्सव साजरा

राहवेना अबोल ह्रदयाला 
छेडूनी तुटल्या तारा 
जीवन जगण्याची प्रेरणा 
मिळो हाच फक्त सहारा

सोनाली रामलाल रसाळ, 
कापूसवाडगाव, ता. वैजापूर