सखे... तुझा गजरा...मराठी कविता Marathi Kavita, Poem

संदीप प्रभाकर कुलकर्णी यांनी लिहिलेली गजरा या विषयावरील कविता

सखे... तुझा गजरा...मराठी कविता Marathi Kavita, Poem

नाजुकशा धाग्यात
मोगऱ्याची धुंद फुलं
जवळजवळ दाटीवाटीनं 
असतात विणलेली.... 

जणू काय, 
काळ्याभोर केसांत तुझ्या 
गुंतायची मस्ती 
त्यांच्या अंगात भिनलेली...

माळून हा मोहक गजरा 
बोलायची तू जेव्हा
सर्रकन चमकून जायची
बिजली कडाडलेली...

दिवस गेले, वर्षे सरली 
काळ मोठा उलटून गेला 
पण आजही माझ्या डोळ्यात 
तुझी छबी अडकलेली...

पाऊस आता बरसून गेला
माझ्या मनीच्या स्वप्नांचे
नभ सारे आता रिते झाले 
उरल्यात फक्त आठवणी...

सखे, आजच्या सायंकाळी
पुन्हा सारखा आठवतो
तुझ्या लांब केसातला गजरा
अन् तू माझी मनमोहिनी...!!!

Sandeep Prabhakar Kulkarni
संदीप प्रभाकर कुलकर्णी, औरंगाबाद.
मो. 9850826679