सख्या रे मराठी कविता - Marathi Kavita

प्रिती सुरज भालेराव लिखित प्रेमाचे वर्णन करणारी कविता सख्या रे ...

सख्या रे  मराठी कविता - Marathi  Kavita

भोळ प्रेम हे माझं 
कधी समजून घेशील
या वेड्या मनाला आस
तू माझी साथ देशील

आयुष्याच्या या वाटेवर
दोघांनी सोबत चालायच
जीवनातील सगळ दुःख
एकमेकांनी वाटून घ्यायचं

लटका राग द्वेष तुझा तू
मनातून काढून टाकावा
बाकी काही नको मला
प्रेमाने फक्त आधार द्यावा

रात्रंदिवस तुझ्यासाठी 
जळत आहे माझा जीव
कधी येईल का रे तुला
माझी थोडीशी कीव

तुझ्या प्रेमासाठी मी
सगळं सहन करेन
वेळ आलीच कधी
जगाशी मी भांडेन

खरं प्रेम करते तुझ्यावर
तुला ते कसे समजेना
तुझ्यावाचून सख्या रे
मला क्षणभरही करमेना

सौ. प्रिती सुरज भालेराव, पुणे