पौर्णिमेचा चंद्र सांगतो,
निखळ मनाची संजिवनी
तळपता सूर्य सांगतो
त्यागाची मुर्ती संजिवनी
रोज मला नक्कीच भेटते
माझ्या आतील संजिवनी
माझ्या नसानसातून वाहते
रक्ताच्या रूपात संजिवनी
माझ्या ह्रदयात धडधडते
स्पंदनरूपी संजिवनी
शेतात मला रोजच दिसते
हिरवीगार संजिवनी...
स्वतः नष्ट होऊन दुसऱ्याला प्रकाशमान
करणारी समईतील वात संजिवनी
भेटली होती मलाही
अशीच एक संजिवनी
कुठं असेल मला भेटलेली ती
आठ दिवसाचीच संजिवनी
संजिवनी ही एक स्त्री नसून
मला मिळालेली प्रेरणा संजिवनी
बाबा चन्ने, धोंदलगाव, ता. वैजापूर