संजीवनी मराठी कविता

सौ. अमिता अरविंदराव घाटोळ लिखित मराठी कविता संजीवनी

संजीवनी मराठी कविता

झाडे लावा झाडे जगवा
निसर्गाचे अनमोल दान ।
प्राणवायू मुळे मानवा
आरोग्याचे मिळे वरदान ॥१॥

संकल्प करू चला नवा
सृष्टी करूया हिरवीगार ।
पर्यावरणाच्या संरक्षणासाठी
झाडे लावूया दारोदार ॥२॥

रोज रोज ताजी हवा
आरोग्याची खरी संजीवनी ।
सुजलाम सुफलाम सृष्टी
हर्ष उल्हास जागेल मनी ॥३ ॥

Amita Ghatol

सौ. अमिता अरविंदराव घाटोळ, अकोला