गुलाबी थंडीत...
सण आला संक्रांतीचा
तीळ आणि गुळ
आरोग्य वर्धक भारी
चिमुकल्यांची पतंगे
आकाशी जावून भिडती
सप्तरंगांनी आकाशी
उधळण हास्य करती
सुवासिनींच्या वेणीमध्ये
मोगरा फुलला बहारदार
वाणाच्या निमित्ताने...
सौभाग्याचे कौतुक करती फार
दर्शन घेता पावलांचे
तीळ गुळ घ्या...
गोड-गोड बोला
शब्द उमटती ओठावरती
किती वर्णू संस्कृतीची थोरवी
सण येती नानापरी
सण आला संक्रांतीचा
ह्रदयात तेज मावेना परी
राणमेव्याची झाली
गर्दी पुजनासाठी
शेतकरी बाप माझा
झगडतो शेतीसाठी
सौ. मनीषा संदिप बैनाडे-महेर,
परसोडा, ता. वैजापूर