ओढ लागली दर्शनाची! जीवा होई हळहळ
संत संगती मिळो! हीच मनाची तळमळ
नाव माझे बहिना! धनी माझा रत्नाकर
ऐकीले निरूपण! मुखी स्वामी जयराम
जिभे लागला चाळा! अंतरले संसार सोहळा
मन करू लागले भाकीत! पाही तुकयासी डोळा
रोज बसे मी कीर्तनी! ऐके तुकोबाचे गुण
घेता संताचे दर्शन! बांधा होई सगुननिर्गुन
होई संसारी विकलांग! मग कैसा संतसंग
देहा मिळो द्यावी गती! घ्यावे मुखी हरिनाम
वाणीला सुख मिळे! नेत्री वाहे नित निर
तुकोबाराया मनी बैसूनी! करी गृह कारभार
घडे ऐके चमत्कार! स्वप्नी आले दिवाकर
देऊनी दर्शन केला! माझा जन्माचा उद्धार
जरी गेले तुकोबा! करुनी वैकुंठ गमन
पाहूनी भक्ताची आस! स्वप्नी केले आगमन
नाही दुसरे मागणे! एक हरी तुझ पाशी
ओव्या, भजन, कवितेस! रहा तुम्ही सर्वसाक्षी
सोनाली रामलाल रसाळ, कापूसवाडगाव,
ता. वैजापूर , जि. औरंगाबाद