जावळीच्या खोऱ्यात
हिरा बघा गवसला
चंद्रराव पळाला पण
योद्धा मुरारबाजी भेटला
पिळदार याच्या मिष्या
भेदक अशी नजर
अंग धाडधिप्पाड
युद्धाला हा जबर
दिलेरखानने फास आवळला
पुरंदरला वेढा टाकला
हा बाजी एकटा उभा
खरा शर्तीने लढला
अवघे सातशे मावळे
सोबत याने घेऊन
पाच हजार शत्रुची
उडवली दाणादाण
शरीर रक्ताने माखलेले
शीर धडावेगळे उडालेले
लढला शेवटच्या श्वासापर्यंत
शत्रूही हैराण झाले
लालच दिलेरखानने दिली
"जहागिरी देतो तुला म्हणाला"
कौल मी घेणार तुझा व्हय
मी तर शिवबाचा मावला
मनी भरोसा मोठा
पुरंदर हाती सोपवला
शिवरायांचा हा मावळा
झुंज देऊन पडला
हा लढायला तिखट
शिवरायांच्या शब्दाखातर
मोघलांना कापला सपासप
धारातीर्थ पडला पुरंदर वर
कवी: स्वप्नील चंद्रकांत जांभळे
ता.दापोली,जि.रत्नागिरी,
मु.पो. शिरखळ,गाव.हातीप(तेलवाडी).