सावळा विठ्ठला Marathi Kavita

विठ्ठलाचे वर्णन करणारी अनुराधा मोतेवार यांची कविता, "सावळ्या विठ्ठला"

सावळा विठ्ठला Marathi Kavita

देव माझा हा सावळा
गळा तुळशीच्या माळा
शोभती रे तुजला
गंध कपाळी टीळा

गोर गरीबांचा कैवारी
उभा राहिला हो हरी
गरीबांचा देव तू
तुला भक्ती आहे प्यारी 

पंढरीच्या विठुराया
तुला माझा दंडवत
महाराष्ट्राचे वारकरी
तुजला हो विनवित

अशीच राहू दे कृपा
तुझी आमच्या वरी
दर वर्षीच घडू दे
आमची पायी वारी

पंढरीचा महिमा राहूदे
असाच वर्षानुवर्ष
तुला पाहून होतो देवा
मनाला आमच्या हर्ष

खंड न पडो आमच्या
साध्या सरळ भक्तीत
सदा राहो तल्लीन
तुझ्या रे सेवेत...

श्रीमती. अनुराधा काशिनाथ मोतेवार,
अंबाजोगाई, जि. बीड