सावित्री तू होतीस म्हणून
आज तुझी लेक बदलली,
घेऊन मोकळा श्वास ती
क्षितिजास बिलगली...
काय असतं स्वातंत्र्य
जाणीव याची झाली,
सावित्री तू होतीस म्हणून
नरकजन्माची गाथा फुलली..
तू उघडलेल्या ज्ञानव्दारातून
प्रवेश सौख्य,आनंदाने केला,
नारी जीवनाची व्यथा संपून
वसा समृद्धीचा घेतला...
सावित्री तूच खरी ज्ञानदेवी
लक्ष्मी अन् गं सरस्वती,
लाख झेलून संकटांना परि
जराही नं डगमगली...
आयुष्याच्या परीघास तू
अर्थ नवा गं भरलास,
आसवांचा खरतड बांध
हसूतून फूलवलास....
विचार येतो मनी क्षणभर
जर सावित्री तू नसती,
युगांयुगाच्या बेड्यांनी
स्त्री गाथा भरकटली असती.
फुललेल्या मनांनी जगी
उभारी अशी घेतली गं,
शतशः प्रणाम तुज चरणी
नारी व्यथा सांधली गं...
किती स्मरू तुझ्या कार्यास
कोटी-कोटी वंदिते,
बालिका मी तर तुझी
वसा ज्ञानाचा चालविते...
सौ. जया वि. घुगे-मुंडे
जि.प.प्राथ.शाळा गावंदरा
परळी वैजनाथ, जि. बीड