तुच इतिहास रचणारी - सावित्रीबाई फुले

सौ. करिश्मा महेश डोंगरे लिखित मराठी कविता तुच इतिहास रचणारी...

तुच इतिहास रचणारी - सावित्रीबाई  फुले

तुच प्रेरणा नव्या युगाची
तुच घडवली शिक्षण क्रांती
शिक्षणाशी नाळ जोडुनी
तोडून टाकली सर्व नाती....

आहेस तु जुन्या युगाची
निश्चय केला घट्ट मनाशी
ज्ञानाचे  शब्द शिकवूनी
हुशार केलेस तुच जनाशी....

निर्मल गंगा तुच अक्षराची
अन्याय, अत्याचाराचे सडे
घाव घेऊनी अंगावरती
अज्ञानाचा पिंजरा तोडे....

समाजासाठी झटली तुच
झालीस स्त्रियांची माऊली
चूल आणि मुल भावना
प्रत्येक घरातून मोडली....

स्री मनाची क्रांती ज्योत
शेणाचा मारा सोसनारी
इतिहास रचूनी शिक्षणाचा
अभ्यासाचा धडा गिरवणारी.....

karisma dongare
सौ. करिश्मा महेश डोंगरे
पंढरपूर.