होता आगमन श्रावणाचे

पूनम सुलाने लिखित मराठी कविता होता आगमन श्रावणाचे ...

होता आगमन श्रावणाचे

धरतीस झाले ओझे योवनाचे
फुलवून पिसारा मोर नाचे
चोफेर गंध दरवळले 
होता आगमन श्रावणाचे

मिलनास वाहू लागली सरिता
कोरडा तो झरा ही वाहतो
रंग दाटले चौफेर हिरवळीचे
होता आगमन श्रावणाचे

नभी घन काळे दाटू लागले
स्पर्श थेंबाचे होता फुले डोलू लागले
मनी स्वप्न रंगू लागले मिलनाचे
होता आगमन श्रावणाचे

बांधूनी झोका उंच आशेचा झुलू लागले
तर कोठे धागे बंधू प्रेमाचे बंधू लागले
भक्तीत रंगले चंद्र-तारे आकाशाचे
होता आगमन श्रावणाचे

ओसाड माळराणी हिरवळ दाटली
नववधू परी धरणी नटली
घनघोर काळोखी जन्म होते कृष्णाचे
होता आगमन श्रावणाचे

poonam sulane

पुनम सुलाने-सिंगल