सिंधुताई मराठी कविता

मनीषा उत्तमसिंग महेर लिखित मराठी कविता सिंधुताई

सिंधुताई मराठी कविता

आज सगळ्यांच्या स्टेटसवरती
तूच झळकतेस, तुझं "स्टेटसच"
इतकं महान आहे की,
सगळे मजबूर झाले आज तुझंच
स्टेटस ठेवण्यासाठी
खरंच "सिंधू" आहेस तू...

सगळ्या अनाथांची माय आहेस तू,
अनाथांना तुझ्या पदराची
सावली देऊन सुखवलंस तू
तुझ्या जवळ जे नव्हतं
ते इतरांना दिलंस तू,
खरंच "सिंधू" आहेस तू...

स्त्रीजन्माला अर्थ देणारी
अनाथांची माई होणारी
एकमेव जगभरात काष्टा घालून
मिरवणारी महाराष्ट्रीयन स्त्री आहेस तू
खरंच "सिंधू" आहेस तू...

संकटाना पायाखाली तुडवून
आख्या जगाला तुझं गुण गायला
लावणारी दुसरी "सावित्री" आहेस तू
खरंच "सिंधू" आहेस तू...

जीवन तर सगळेच जगतात
पण अनाथांना जीवनदान
दिलस तू...
आई होणं सोपं नाही तरीही
लाखो अनाथांची आई बनलीस तू,
खरंच "सिंधू" आहेस तू...

आज अख्या जग तुझ्या
जाण्याने हळहळतंय
सांग ना आता पुन्हा
कोणत्या रूपात दिसशील तू
सांग आता अनाथांची
आई होण्यासाठी कोणत्या
रूपात येशील तू
खरंच “सिंधू” आहेस तू.

Manisha Maher

मनीषा उत्तमसिंग महेर,
परसोडा, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद