सिंधुताई सपकाळ अनाथांची आई

शशिकला गुंजाळ लिखित मराठी कविता सिंधुताई सपकाळ अनाथांची आई

सिंधुताई सपकाळ अनाथांची आई

गेला मायेचा पदर 
लेकरं झाली पोरकी
दुसरी आई नाही भेटणार
माय प्रेमळ तुझ्यासारखी ।।१।।

जातीसाठी माती खाऊन 
हाडाची काडं केली 
अनाथांची माय होती तू
 जगी किर्ती झाली ।।२।।

स्मशानातलही अन्न खाल्लं 
पोटात गोळे आले 
नाळ तोडली दगडाने तेव्हा 
मातृत्व जागे झाले ।।३।।

काळाने केला घात 
माय तुझे प्राण गेले 
प्रत्येकाच्या डोळ्यात 
दुःखाचे अश्रू आले।।४।।

Shashikala gunjal

सौ. शशिकला गुंजाळ, भुम