जेव्हा या देशात..
कोणत्याही धर्माचा, जातीचा..
प्रांताचा.. वर्णाचा..
घेणाऱ्या.. श्वावासावर
दबाव नसेल... तेव्हा..
ते 'स्वातंत्र्य' असेल..
जेव्हा, नवीन विचार मांडताना..
मनात भीती.. वाटणार नाही..
तेव्हा..आम्ही 'स्वतंत्र' असू..
एकीकडे.. मुबलक असणारं ..
स्वातंत्र्य.. आणि आतून पोखरत
जाणारे.. लोकशाहीचे दीपस्तंभ..
जेव्हा ही दुही मिटेल..
तेव्हा आम्ही 'स्वतंत्र'असू..
स्त्री, पुरुष, तृतीयपंथी..
एलजीबीटी.. बंद.. होतील..
सर्व चर्चा.. लिंगभेद.. संपून..
त्यातलं 'माणूसपण' जेव्हा कळेल..
तेव्हा आम्ही 'स्वतंत्र' असू..
नव्या पिढीच्या ..
नव्या स्वप्नांना..
नवी दिशा.. शोधताना..
पाऊल अडखळणार.. नाहीत..
तेव्हा आम्ही 'स्वतंत्र' असू.
(तसा माझा देश केव्हाच स्वतंत्र झाला आहे)..
स्नेहा कोळगे, मुंबई