मकर संक्रात गोड बोल बोला

अरुण वि.देशपांडे लिखित मराठी कविता गोड बोल बोला

मकर संक्रात गोड बोल बोला

तीळ गुळ घ्या चला 
गोड गोड बोल बोला 

स्नेह-जिव्हाळा असतो
गोड साखर दाण्यावरती
म्हणू भेटेल जो त्याला
गोड गोड बोल बोला   

रंग बिरंगी पतंग किती
अंबरात मुक्त विहरति
डौलात भिरभिरणे त्यांचे
डोळ्यांचे पारणे फेडिती 

कटुता जाऊ विसरुनी
कठोर उगीच का बोला
तीळ गुळ घ्या चला
गोड गोड बोल बोला 

Arun V Deshpande

अरुण वि.देशपांडे -पुणे.