तीस सेकंदाचा स्टेटस
बरेच काही सांगून जातो
प्रत्येकाच्या मनातील भावना
तुम्हा आम्हाला बोलून जातो
तीस सेकंदाचा स्टेटस
बरेच काही सांगून जातो
देवाज्ञा झालेल्या व्यक्तीला बघून
क्षणात भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो
तीस सेकंदाचा स्टेटस
बरेच काही सांगून जातो
बत्तीस कोटी देवांचे दर्शन
मिळताच प्रणाम करतो
तीस सेकंदाचा स्टेटस
बरेच काही सांगून जातो
दिवसभरच्या चालू घडामोडी
जगभरात प्रसिद्ध करतो
तीस सेकंदाचा स्टेटस
बरेच काही सांगून जातो
मराठी, हिंदी सदाबहार
गाण्यांची करमणूक करतो
तीस सेकंदाचा स्टेटस
बरेच काही सांगून जातो
काहींचे प्रेरणादायी विचार
जगण्यास आधार देतो
तीस सेकंदाचा स्टेटस
बरेच काही सांगून जातो
उत्सुकता सर्वांना असते
माझे स्टेटस कोण कोण बघतो
तीस सेकंदाचा स्टेटस
बरेच काही सांगून जातो
कधी कधी छोट्याश्या संदेश
वरून मोठा कलह निर्माणही होतो
तीस सेकंदाचा स्टेटस
बरेच काही सांगून जातो
चुकीच्या गैरसमजूतीमुळे
जवळचा व्यक्ती दुरावतो
तीस सेकंदाचा स्टेटस
बरेच काही सांगून जातो
काहींचा भक्ती भावाचा झरा
अविरतपणे सदा वाहतच असतो
तीस सेकंदाचा स्टेटस
बरेच काही सांगून जातो
हल्ली नोंद करून ठेवत नाही
वाढदिवस स्टेटस वरच कळतो
कवी: स्वप्नील चंद्रकांत जांभळे
ता. दापोली, जि. रत्नागिरी,
मु.पो.शिरखळ,गाव. हातीप (तेलवाडी).