शल्य मनातील Marathi Kavita

सौ. जयश्री अर्जुन मुंडे लिखित मराठी कविता शल्य मनातील

शल्य मनातील Marathi Kavita

मन माझे गेले खंगून
आघात तुझे गेले सांगून

वाचता मम हृदय मी 
झाले दुःखाने हैराण मी

नको नको वाटते मज काही
नैराश्य दाटले अंतरी असे काही

मन माझे कशातच रमेना रे आता
आरोपाविना नाही तुझ्या कसल्याच बाता

काय काय स्वप्ने मी रंगवली
तव वर्तूनुकिने ती भंगली

असा माझा जीव रंगला
तू माझा ना समजून संपला

नाते होते अंतरीचे 
होते सतत कटकटीचे

नको वाटते मज आता ते नाते
आधार दिला नाही तू मजला

संकटात कधी ना तू धावला
मला कधी ना तू जीव लावला

असे कसे निष्ठूर वागणे तुझे
असे तुसडे रिपुही ना माझे

असा काय केला होता मी गुन्हा
येवू नको माझ्या आयुष्यात तू पुन्हा

खूप सुखात ठेवशील 
मला तू जपशील 

हा माझा भ्रम जाहला
माझे मन उभे मज खायला

आयुष्याची आणि गुणांची 
झाली माझ्या मतीच माती

अशी नको वाटत आहेत मज नाती
घरात राहीले नाही प्रेम पूर्ण नाती

जे हवे होते मज बंधन ते आज नको आहे 
अशी बिकट परिस्थिती तू माझी केली आहे

Jayshree Munde

सौ. जयश्री अर्जुन मुंडे,
जि.प. उच्च प्राथमिक शाळा, 
गावंदरा, ता. धारूर, जि. बीड