स्वातंत्र्याला अचूक दिले
वळण कठोर शिस्तीचे
अदभुत निर्माणकार्य घडले
सर्वश्रेष्ठ राज्यघटनेचे....
भेट लाभली अधिकारांची
सोबत जाणीव कर्तव्याची
नाही कुणी मोठा, ना लहान
असा घडला माझा देश महान...
शक्ती एकवटली जनाजनात
जागरूक मताधिकारात
अराजकात सर्वांची साथ
एकविचाराने करू मात...
वेश-भाषेने असू आम्ही वेगळे
जात-धर्म-पंथ निरनिराळे
एकच ध्येय आमच्या मनात
महाशक्तिशाली भारताची
सुवर्णज्योत लावू घराघरात....!
संदीप प्रभाकर कुलकर्णी, औरंगाबाद.