स्वविश्वास मराठी कविता Marathi Kavita, Poem

विश्वासाच्या बळावरती जग जिंकता येते, स्वविश्वास असेल तर, जगातील कोणतेही काम अशक्य नाही

स्वविश्वास मराठी कविता Marathi Kavita, Poem

उमलणाऱ्या फुलापरी
शब्दांनाही फूलता यावे
बंद मनाच्या कोपऱ्यात
होऊनी गंध दरवळता यावे

 नको भाषा भेदभावाची
एक मताने जगता यावे
देण्यास गारवा जगाला
होऊनी झरा वाहता यावे

करण्यास सामना वादळाचा
पर्वतापरी होता यावे
फळ संस्काराचे देण्यास
वृक्षापरी मातीत रुजता यावे

करण्यास स्वप्नांची पूर्ती
बळ पंखात भरता यावे
निरभ्र विचारांच्या आकाशी
स्वविश्वासाने उडता यावे

Poonam Sulane

पुनम सुलाने, हैद्राबाद