हळवे मन Marathi Kavita

जया विनायक घुगे - मुंडे लिखित मराठी कविता हळवे मन

हळवे मन Marathi Kavita

किती अवरायचे या मनाला
कसे, कसे सावरायचे,
आयुष्याच्या लपाछपित
कुठे सांगा दडवायचे...

प्रसंग येता नेमका
हळवे मन होऊन जाई,
अश्रूंची माला घालून
सहज वाहून जाई...

क्षणाक्षणाला रंग त्याचा
कळे ना कसा बदलतो,
या अवखळ मनाचा खेळ
कुणाना कळला कसा घडतो...

कधी कठोर होऊन सहज
काळजावर घाव घालीते,
या मनाची रीतच न्यारी
कधी कुणाचे वैर घेते...

हळवे मन मात्र सैरभैर
हळूच कानोसा घेते,
मायेच्या स्पर्शाने जणू
अवघे विश्व कवेत घेते...

Jaya Ghuge

जया विनायक घुगे - मुंडे
परळी वैजनाथ, बीड