मैत्रीचा किनारा मराठी कविता - Marathi Kavita

स्वाती नानासाहेब जाधव लिखित मराठी कविता मैत्रीचा किनारा यामध्ये मैत्रीचे वर्णन केले आहे.

मैत्रीचा किनारा मराठी कविता - Marathi Kavita

काय सांगू मैत्रीच्या फुला
शोधत होते एक सहारा, 
तुझ्या रूपात मिळाला
अमृतापरी मैत्रीचा किनारा.

आठवण येताच तुझी 
हसू लागते गाली,
तुझ्या माझ्या मैत्रीला
नजर लागू नये कूणाची .
 
मैत्रीला ना रंग नसतो,  
मैत्रीला ना गंध असतो ,
मैत्रीला नेहमी सोबत
राहण्याचा वेडा छंद असतो.

तू सोबत असताना माझ्या
परकेपणा जाणवलाच नाही कधी,
बोलण्यात तुझ्या परकेपणा 
मला कधी भासलाच नाही.

ज्या ठिकाणी आपली
प्रेमळ मैत्री झाली,
पुन्हा त्याच ठिकाणा
आपली भेट झाली.

काय झाली अशी जादू 
दुसरी मैत्रीण नाहीच झाली,
कावेरी का आवडतेस तूच मला
मलाच का कळत नाही.

स्वाती नानासाहेब जाधव