सण मकरसंक्रांतीचा

पूनम सुलाने लिखित मराठी कविता सण मकरसंक्रांतीचा

सण मकरसंक्रांतीचा

बोल मुखाने बोलूया
जसा गुळाचा गोडवा
नव्या आशेच्या धाग्याने
उंच पतंग उडवा 

नाते जोडूया नव्याने
गुण स्वीकारू तिळाचे
सारे भूलून रुसवे
वाण देऊया प्रेमाचे 

नव्या रूपात नव्याने 
साऱ्या नटून थटून 
क्षण आनंदी घालवू
वाण देण्यास भेटून 

भारी खिचडी चवीस
धार तुपाची त्यावर
सारे रहावे मिळून
देतो संदेश त्योहार 

उंच कितीही भरारी 
धागा असावा हाताशी
जग जिंकावे प्रेमाने
नाते जोडुनी मातीशी 

Poonam Sulane

पूनम सुलाने-सिंगल