मोबाईलची जादू मराठी कविता Marathi kavita, Poem

श्री. सुभाष शांताराम जैन लिखित मराठी कविता मोबईलची जादू

मोबाईलची जादू मराठी कविता Marathi kavita, Poem

मोबाईलची जादू. कविता
तो मंदिरात उभा होता
देवाला हात जोडणार होता
इतक्यात मोबाईल त्याचा खणखणला
हात त्याचा मोबाईलकडे वळला ll

लग्न मंडपात उभा होता
वधुला हार घालणार होता
इतक्यात मोबाईल त्याचा खणखणला
हात त्याचा मोबाईलकडे वळला ll

जेवणाचे ताट घेऊन उभा होता
जेवायला सुरुवात करणार होता
इतक्यात मोबाईल त्याचा खणखणला
हात त्याचा मोबाईलकडे वळला ll

आपरेशन थेटरमध्ये उभा होता
आपरेशनला सुरुवात करणार होता
इतक्यात मोबाईल त्याचा खणखणला
हात त्याचा मोबाईलकडे वळला ll

विषाचा प्याला समोर होता 
विष घेऊन स्वत:ला संपवणार होता 
इतक्यात मोबाईल त्याचा खणखणला
आत्महत्येचा विचारच त्याने बदलला ll

श्री. सुभाष शांताराम जैन. ठाणे.
कवी, पत्रकार, लेखक छायाचित्रकार
'कस्तुरीराम,' साईनाथ सोसायटी,
वर्तक नगर, ठाणे ६.
subhashsjain@yahoo.com 
मोबाईल नंबर . 9821821885
Whatsapp 8779348256