माझ्यासाठी असलेली... ती

कु. रोहिणी पंडीत मोरे लिखित मराठी कविता माझ्यासाठी असलेली... ती

माझ्यासाठी असलेली... ती

आपल्या आयुष्यात कुणीतरी नकळतपणे यावं,
अन् गोड गोड चार पानांचं प्रेमपत्र आपल्यासाठी लिहावं

दररोज तीने अर्धातास वाटेकडे बघावं,
तू आल्यावर जेवायचय असं तीने म्हणावं

बघता बघता सरून गेली आमची कॉलेजची वर्ष,
आता फक्त उरलाय त्या आठवणींचा स्पर्श

सुरुवातीला नाही आवडली मला जिन्सवाली ती,
अन् काय माहित का नको वाटायची मला तिची सोबती

काय घडलं अचानक अस की ती माझी झाली,
अन् मैत्रीणीच्या रुपात ती माय बनून आली

रडायला लागले मी, की पुढे यायचे तिचे दोन्ही हाथ,
मी आहे ना गं... केवढी द्यायची ती मला साथ

बघता बघता माझी ती झाली ना गोड नवरी,
अय सांगतेय तुला तूच बरका माझी कलवरी

माझ्या सुंदर परीला राजकुमारच भेटला,
ती जाणार खूप लांब म्हणून जीव ही माझा तुटला

मेहंदीच्या रातीला भेटायला गेले मी 'ती' ला
मेहंदीच्या हाताने घट्ट मिठी मारली तीने मला...

हळदीची ही रात्र अशीच दोघी एका बिछान्यात,
आयुष्याची शिदोरी बांधली आम्ही गाठोड्यात

ढसाढसा रडाणारी ती डोळे पुसत होती,
नाणीला अन् आप्पाला करमेल का म्हणून हुंदके देत होती

लग्न लागल तिचं मला वाटलं एकटीच मी आता,
दुसऱ्या दिवशीच विचारलं मला भेटलीच नाही गं जाता जाता

तिच्या गोड आठवणी मला सुख देऊन जातात,
करणं मैत्रीच्या आठवणी डोळ्यांची कड पाणवतात

कोण होती ती आहे ना ही मोठी गंमत, 
कारण तीचि हिऱ्याहूनही अधिक आहे माझ्यासाठी किंमत

ती म्हणजे दुसरी नाही कोणी फक्त माझी पूनम,
देवा माझ्यासाठी तिला बनवलं म्हणून तुला नमन...

Rohini Pandit More
कु. रोहिणी पंडीत मोरे,
नाटेगाव, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर