विज्ञान शाप की वरदान मराठी कविता - Marathi Kavita

सौ. अंजली बांते विज्ञानावर लिखित मराठी कविता विज्ञान शाप की वरदान...

विज्ञान शाप की वरदान मराठी कविता - Marathi Kavita

 शोध लावले अनेक मानवांनी
 विज्ञानामुळे झाली प्रगती
 आपणच ठरतोय कारणीभूत
 करण्या पृथ्वीची अधोगती।। 


 विज्ञान ठरले वरदान
 अनेक जीव वाचवू शकलो
 अनेक साथीच्या रोगांना
 प्रतिबंधन लावून जिंकलो।। 


मोबाईलशी नाते जुळले
लांबचे सर्व जवळ आले 
व्हाट्सअप, फेसबुक गुगलने
विद्यापीठच तयार केले। । 


खूप प्रगती केली मानवाने
चंद्रावर ही पोहोचला
रासायनिक खते आणि कीटकनाशकांनी
पाण्याचा जमिनीचा दर्जा घालवला।। 

कारखान्यांमुळे झाला धूर
प्रदूषण वाढले हवेचे, पाण्याचे , आवाजाचे
दूर्लभ झालेल्या शुद्ध हवे करिता
वर्ग लावावे लागत आहेत प्राणायामाचे।।


आधुनिकीकरणामुळे झाला 
नैसर्गिक संपत्तीचा नायनाट 
श्वास विकत घ्यावा लागतोय
असा परिस्थितीने घातलाय घाट।। 

सौ, अंजली बांते, भंडारा