नाद घुमला

प्रीती भालेराव यांची "नाद घुमला" एक महत्वपूर्ण कविता

नाद घुमला

आषाढी कार्तिकी। पंढरीची वारी।।
आहे माझे घरी। वाटे सुख॥

आराध्य दैवत। विठ्ठल रुक्मिणी॥
सदा माझे मनी। वसतसे॥

विठ्ठल माझिया। जिवीचा जिव्हाळा॥
मनी कळवळा। वैष्णवांचा।।

सकल जीवांचा। असशी कैवारी॥
तूच माझा हरी। सावळा रे।।

पताका घेऊन। वारी ही निघाली॥
दिंडी ती चालली। वैष्णवांची॥

सांगतसे प्रीती। भजा विठ्ठलाला॥
नाद हा घुमला। चराचरी॥

 सौ. प्रिती सुरज भालेराव,  पुणे.