आईचा प्रेम ती कधीही
करत नाही व्यक्त
आहे तिचे प्रेम इतके
असे रे अव्यक्त
आई मुलांच्या प्रेमाचे
अव्यक्त असे प्रीत
जन्मोजन्मी चालू असे
आईच्या प्रेमाची रीत
येवो कितीही तिच्यावर
संकटाचा काळ
लढणी संकटाशी एकटी
द आनंदी वळूनी माळ
नाही जमले कुणाला मोजण्याचे
तिच्या प्रेमाचा मोलl
अव्यक्त आहे ते आईचे
प्रेम अनमोल
आहे वक्ते प्रेम आईचे
साथ दे असं कुठलीही वेळ
तिच्या प्रेमाचा झुळते
आनंदी माय सुखान मेळ
✍ कु. प्रणोती राम शेंडे✍