अगदी तुझ्यासारखा
एक तरी मित्र असावा
जो दिनराती माझ्या
जवळच असावा
तुझ्यासारखा प्रेमळ
हसरा, लाजरा, हळवा
मनापासून मला
समजून घेणारा
तुझ्यासारखा नम्रतेने
हसून बोलणारा
ज्ञानाचा गर्व न करता
माझ्याशी वागणारा
न चिडता, न रागावता
आपलसं करणारा
मी थकली असेल तर
चहा घेशील का म्हणणारा
खरच, तुझ्यासारखा
एक तरी मित्र असावा
जो दिनराती माझ्या
जवळच असावा
तुझ्यासारखा
एक तरी मित्र असावा
जो सहज भावनांना
समजून घेणारा असावा
तुझ्यासारखा
एक तरी मित्र असावा
माझ्या आयुष्यावर
कविता करणारा असावा
तुझ्यासारखा
एक तरी मित्र असावा
जो मनाच्या अगदी
जवळ असावा
तुझ्यासारखा
एक तरी मित्र असावा
तुझ्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची
सर्वांवर छाप टाकणारा असावा
तुझ्यासारखा
एक तरी मित्र असावा
जो हृदयाचा ठाव
घेणारा असावा
खरंच तुझ्यासारखा
एक तरी मित्र असावा
जो कायम मला मनात
ठेवणारा असावा
पुनम चंद्रकांत बेडसे,
सिनेअभिनेत्री तथा निवेदिका आकाशवाणी केंद्र, धुळे