ही वेदना विरहाची

जया विनायक घुगे-मुंडे लिखित मराठी कविता ही वेदना विरहाची

ही वेदना विरहाची

जखमा अशा सुगंधी
ही वेदना विरहाची,
तळमळ ऊरी भरली
कितीकाळ तरी सोसायची...

स्मृतींचा कल्लोळ आता
अंतरी घुमतो आहे,
मूक होऊन त्याही 
हुंदक्यातूनी वाहे...

अर्थ माझ्या जगण्याचा
तुझ्या रूधिरांत वाहतो,
एकांताचा काल भयावह
पुन्हा फिरून सतावतो...

ही प्रीत जीवघेणी
गेली सहज वेडावून,
जखमांचा सुगंध
नसानसांत भरून...

हरवली एकरूपता
दूरवर मी शोधते,
सुगंधात जखमांच्या
तुज बेधुंद आठवते...

Jaya Ghuge Munde
जया विनायक घुगे-मुंडे
परळी(वै.), बीड