हरी माझा विठ्ठल पांडुरंग
जगाचा असशी पालक
तू चालविशी सकल विश्वा
आहेस मायाचक्रचालक
तुला भेटण्याची या मनी
बहू आस लागलीसे
जागृती सुषुप्ती स्वप्नी
मला तूच तू दिसतसे
स्वरूप सावळे तुझे
मुखकमल बहू सुंदर
शोभून दिसतो तुला
पिवळा असा पितांबर
येताच तुझ्या द्वारी देवा
आनंद मनी होतो खूप
डोळे भरून पाहीन मी
माझ्या विठोबाचे रूप
तुला पाहताच रे विठ्ठला
माघारी न फिरे माझी दृष्टी
किती विचारपूर्वक बनविली
देवा ही सुंदर अशी सृष्टी
तुझ्या त्या चरणांवर
लीन मला व्हायचे
तुझे ते मुखकमल
डोळे भरून पाहयाचे
स्वरूप सावळे पाहुनिया
नयनात माझ्या अश्रू दाटले
चरणांशी तुझ्या शेवट व्हावा
असे अनुपम्य सुख मला वाटले
प्रिय आहे मला तू विठ्ठला
आणि तुझी ती पंढरी
विठ्ठल स्वरूप घेऊनिया
अवतरलास तू भुवरी
प्राण आला कंठाशी
आता मला दर्शन दे
बाकी काही नको देवा
अखंड तुझी सेवा घडू दे
सौ. प्रिती भालेराव, पुणे