आज तिरंग्यात पावन झालो मी...

सौ. नीता यशवंत भामरे लिखित मराठी कविता आज तिरंग्यात पावन झालो मी...

आज तिरंग्यात पावन झालो मी...

राहु केतूसम भासले मज  शत्रू 
आले  गेले  किती  ते रणांगणी
हसत  कवटाळले  मृत्यूस  मी
थांबवू न शकले कालचक्र कुणी ।।१।।

पाहून सिंधूच्या उफाळत्या लाटा
नसा  नसांत  सळसळते  स्फूर्ती
सह्याद्रीचा  कणखर  बाणा  देई
बळ  मज  रक्षण्या  माझी धरती   ।।२।।

मातृभूमीच्या  रक्षणार्थ उभा मी
सळसळते रक्त नि फूलते  छाती
करण्या  सलाम उंचावती  माना
येता अस्मीतेचा  ध्वज तो हाती ।।३।।

भारतमाता की जय वंदे मातरम
दऱ्याखोऱ्यात घूमता ललकारी
त्वेषाने लढ़ती शूरवीर रणांगणी 
देई  साद  ही लढण्यास उभारी   ll ४ll

ऋण भूमातेचे  फिटणार नाही
आलेजरी मज शतदा वीरमरण
तुझ्या  कुशीत  विसावता आई
सौभाग्य माझे देह होईल पावन  ।।५।।

झेलून गोळ्या निधड्या छातीवर
रक्तबंबाळ होऊनी आलो कामी
देशासाठी  पत्करले वीरमरण ते
आज तिरंग्यात पावन झालो मी.।।६ ।।

Nita Bhambhare

सौ. नीता यशवंत भामरे, नासिक