पारदर्शी आरसा मराठी कविता - Marathi Kavita, Poem

सौ. प्रिती सुरज भालेराव लिखित मराठी कविता पारदर्शी आरसा यामध्ये एखादं व्यक्तीत्व कसं असावं याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे "पारदर्शी आरसा"

पारदर्शी आरसा मराठी कविता - Marathi Kavita, Poem

सर्वांपेक्षा वेगळं अस 
आहे एक व्यक्तित्व
ज्यांच्यामुळे प्राप्त झाले
माझ्या कवितेला कवित्व

साधी राहणी ज्यांची
उच्च विचारसरणी
त्यांच्यामुळेच होतेय
धारधार माझी लेखणी

प्रत्येक गोष्टीत माझ्या
मला सहकार्य करतात
लिखाणातील अडचणी
ताबडतोब दूर करतात

मी पुढे जाण्यासाठी
सतत वाट दाखवतात
कुणीच करणार नाही
असे मार्गदर्शन करतात

स्वभाव आहे कोमल
अती महत्त्वाकांक्षी
गुण किती वर्णू त्यांचे
कायमच असते दूरदृष्टी

लिखाणातून कोणताही विषय
अगदी स्पष्टपणे ते मांडतात
सर्वांना हवी असते तशीच
शब्दांची जुळवाजुळव करतात

लेखणीत त्यांच्या कायम
जणू सरस्वती अवतरते
म्हणूनच तर मी त्यांच्या 
पावलावर पाऊल ठेवते

पर्वताएवढ्या माणसाचे
शब्दात वर्णन करू कसे
प्रयत्न मी केला आज हा
शिवधनुष्य उचलले जसे

रोजचं तुमच्या आयुष्यात
आनंद नव्याने यावा
संपूर्ण महाराष्ट्राला
वाटावा तुमचा हेवा

सारं काही स्पष्ट दिसतं
जसा जणू पारदर्शी आरसा
जिवंत असेपर्यंत जपणार
आपल्या साहित्याचा वारसा

कशी वर्णू आपले गुण
कशी सांगू मी महती
वर्णन तुमचे करण्यास
शब्दही कमी पडती

सौ. प्रिती सुरज भालेराव