लता दिदींना श्रध्दांजली

सौ. रोहिणी अमोल पराडकर लिखित मराठी कविता लता दिदींना श्रध्दांजली

लता दिदींना श्रध्दांजली

मृत्यू जरी आला इथे
थांबेल क्षणभर निःशब्द
ऐकण्यात तल्लीन होऊन
तोही साथ देईल स्वरबद्ध

गानसम्राज्ञी सप्तसूरांची राणी
धर्म जात पंथ नाही भेद
अंतरात स्वर उमटवले खास
तारा निखळला मनी खेद

ऐकू पुन्हा पुन्हा तिचेच स्वर 
शरीराने नाही मनाने साथ
ऐकून तिची अमृत वाणी 
शिरी सरस्वतीचा वरदहस्त 

महाराष्ट्राची अस्मिता 
भासे  सरस्वती भूवरी
एकनिष्ठ भक्त मंगेशाची
देव अवतार खरी

Rohinni Amol Paradkar

सौ. रोहिणी अमोल पराडकर,
कोल्हापूर