खरी श्रीमंती मराठी कविता Marathi Kavita, Poem

प्रिती सुरज भालेराव लिखित मराठी कविता "खरी श्रीमंती" खरी श्रीमंती काय असते ते या कवितेतून दिसून येते.

खरी श्रीमंती मराठी कविता Marathi Kavita, Poem

माणसाने धनाने नाही
मनाने श्रीमंत असावं
आपल्यातील साधेपण
आपणच जपावं

पद आणि प्रतिष्ठा ही
कधीच मोठी नसते
माणसाच्या वागण्यात
नम्रता हवी असते

आपल्या आयुष्यात कधी
पैशाला महत्व देऊ नये
नको त्या अमिषांना
कधीच बळी पडू नये

धनाची श्रीमंती आपली
कधीच उपयोगाची नसते
माणसाची माणुसकीच
खूप महत्त्वाची असते

कोणत्याही परिस्थितीत
माणुसकी नाही विसरायची
वाईट वेळेमध्ये माणसाची
आवर्जून साथ द्यायची

माणसाने माणसाशी
माणुसकीने वागावं
कोणतही नात असो
आपुलकीने जपावं

मरताना शेवटी आपण
माणुसकी घेऊन जाणार
देह सोडला आपण तरी
माणुसकी लक्षात राहणार

माणसाची खरी श्रीमंती
नेहमी वागण्यात असते
आपण कसे दिसतो याला
कधीच महत्व नसते

Preeti Bhalerao Bolmarathi

सौ. प्रिती भालेराव, पुणे