त्यागीला देह मराठी कविता Marathi Kavita

सोनाली रामलाल रसाळ लिखित वैकुंठवासी ताज्जोदिन महाराजांवर कविता 'त्यागीला देह'

त्यागीला देह मराठी कविता Marathi Kavita

हरी नामाचा जयजयकार 
हळूच येता ह्रदयात कळ
सोडून सोयऱ्यांचा दरबार 
भक्तात पसरली हळहळ

नामसंकिर्तन मांडूनी सोहळा 
सावळा श्रीहरी देखीला डोळा
पारणे फिटले जन्मोजन्मीचे
नाहीच दर्पण जातीपातीचे

नव्हतेच सोपे देव घडणे 
अन् देवाला अंतर्धान पावने
रसाळ अमृतवाणी मधूनी
विठ्ठल विठ्ठल रस ओतने

होत्याचे नवते झाले 
तरी वैकुंठ गमन केले
नरदेह नश्वर असूनही 
आत्म्यास अमर केले

किर्तनात त्यागीला देह 
हे पुण्य कसे कमविले
सांगा संत ताजोद्दीन 
देव वर्णी कशी मिळविले

सोनाली रामलाल रसाळ, 
कापूसवाडगाव, ता. वैजापूर