अवकाळी पाऊस

सौ. जयश्री अर्जुन मुंडे लिखित मराठी कविता अवकाळी पाऊस

अवकाळी पाऊस

अवकाळी पाऊस पडला ग धरतीवर
पीक गेलं ग वाहून  शेताचीच नुकसान..1

झाली गारपीट लई गेले पीक फळ झडून 
पावसाच्या माऱ्याने गेले उर्वरित सडून...2

बळीराजा घेई कर्ज शेती पिकवाया सोन
होता पावसाचा कोप उडे बळीराजाची झोप...3

कसे फिटेल ते कर्ज कसा होईल ग सण
पाहून नुकसान रानाचे हरवले बळीचे भान....4

नसे अंगाला कपडा नसे खाया भाकर
तरी राबे माझा बळी होई धरणी चाकर.....5

दोष यात कोणाचा कळेना च त्यास
कंठ येई दाटून गिळे ना घास.,....6

Jayshri Munde

सौ. जयश्री अर्जुन मुंडे
अंबाजोगाई