अवकाळी पावसाचं दुःख
दुःख बिचाऱ्या बळीराजाला
बळीराजाला किती यातना
यातना नि कष्ट जीवनाला...
जीवनाला असे चिंतेची झळ
झळ बसून त्रास भोगतोय
भोगतोय तो एकटाच सारे
सारे नुकसान पाहून रडतोय...
रडतोय पण हिंमतीने लढतोय
लढतोय तो निसर्गचक्राशी
निसर्गचक्राशी,सतत संकटाशी
संकटाशी अविरत झुंज देतोय...
देतोय साऱ्या जगाला अन्नधान्य
अन्नधान्य पुरवून स्वतः उपाशीच
उपाशीपोटी राहून भाळी लिहिलंय
लिहिलंय सदा उपेक्षित जीवनचं...
जीवनचं वाहिलंय त्याने शेतासाठी
शेतासाठी काळीज नेहमी तुटतंय
तुटतंय मन पण कधी दाखवत नाही
नाही दिसत बळीराजा किती सोसतोय...
सौ. शितल बाविस्कर राणेराजपूत, जळगाव