वडापाव मराठी कविता Marathi Kavita, Poem

उभ्या महाराष्ट्राला वेड लावणारा वडापाव कवितेतून साकारतो तेव्हा..

वडापाव मराठी कविता Marathi Kavita, Poem

अवघ्या महाराष्ट्राला
माहित असणार नाव
लहानथोर सर्वांनाच
प्रिय असतो वडापाव

चणा डाळीच्या पिठामध्ये
हळद आणि मीठ घातले
वडापाव बनवण्यासाठी 
बॅटर आता तयार झाले

बटाट्याच्या भाजीशिवाय
वडापाव कसा बनेल
आंबटगोड अशी मस्त
चटणीही त्याला शोभेल

झणझणीत भाजी केली
सुवास असे त्याचा आला
काय सांगू थाट त्याचा
दूरवर सुगंध पसरला

कितीही श्रीमंत असला माणूस
आवर्जून वडापाव खातो
गोरगरीब देखील कधीपण
हातगाडीवर नेहमी थांबतो

एक घास खाल्ला त्याचा
तोंड सगळ्यांचे खवळते
कितीही खाल्ले ना वडापाव
अजून एक खाऊच वाटते

खाण्याची तल्लफ झाली
भरपूर वडापाव खाल्ले
पैसे द्यायची वेळ आली 
सगळेच मागे सरकले

काहीही असो खाल्ल्यावर
सर्वांनीच तृप्तीची ढेकर दिली
खूप वर्षांनंतर आज मला
वडापावची पार्टी आठवली

सौ. प्रिती भालेराव, पुणे