दिवाळीचा पहिला दिवा
वसुबारस दिन सजला,
उजलूनी ज्योती चाहुदिशा
क्षण प्रेमाचा हसला...
भूतदया संस्कृतीची शिकवण
गाय - वासराची उदारता,
आईची ममता अवर्णनीय
मुक्या भावनांची महानता...
दिन मायेचा आज बहरला
दारी सडा, रांगोळीचा वारसा,
लाख रंगांची किमया
परिसर सारा हसला...
समृध्दी, भरभराट नि शांतता
जीवनाचे सौख्य देई,
दिवाळीची पहिली पणती
प्रकाशमान होई...
तेजोमय सण आला
वसा प्रकाशाचा घेऊन,
रात्रीत रंग लकाकते
मनामनात हास्य फुलवून...
जया विनायक घुगे - मुंडे
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षिका, गावंदरा,
परळी वैजनाथ, बीड