विठूराया... Marathi Kavita

भक्त आणि विठ्ठल यांचे नातं उलगडविणारी मृणाल गीते यांची रचना "विठूराया"

विठूराया... Marathi Kavita

भेटीला वारीत। पंढरीसी आलो।
तुझाच मी झालो । पांडुरंगा ।।१।। 

सावळा विठ्ठल। सावळी माऊली ।।
तुझीच साउली । माझेवरी ।।२।। 

वारकरी नाचे ।होऊनिया दंग।
जातीपाती रंग। विसरोनी ।।३।। 

विसरलो सारे । हेवेदावे येथे।
चंद्रभागा जेथे ।वाहतसे।।४।। 

चाले अनवाणी  । मनी एक ध्यास।
एकच विश्वास । दर्शनाचा ।।५।। 

मागतो मागणे ।नको कोणी दुःखी
राहो सर्व सुखी ।भवताल।।६।। 

आहे तसा जातो। वारीमध्ये येतो।
दर्शन तो घेतो ।भक्त तुझा।।७।।

मृणाल गिते, नाशिक