काय रे विठूराया
तू बरा आहेस ना..!
तू बराच असशील
उघड्या डोळ्यांनी
अन्याय-अत्याचार
पाहत...
कारण
तू विटेवरून उतरायला
तयारच नाही म्हणे...
कमरेवर हात टेकवून
किती दिवस भक्ताची
हाल अपेष्टा पाहशील रे...
तुझा एकनिष्ठ वारकरी
तुकोबाचेही कोलित
अविचारी लोकांनीच
केले रे...
तरिही तू
विटेवरून उतरायला
तयारच नाही रे...
आजही...
कित्येकाच्या शरीराची
कत्तल होतेय...
कित्येकांच्या विचाराची
कत्तल होतेय...
कित्येकांच्या मनाची
कत्तल होतेय...
तरीही तू शांतपणे
कमरेवर हात टेकवून
विटेवर उभा आहेस रे...
उघड्या डोळ्यांनी
सर्व काही पहात...
बाबा चन्ने, धोंदलगाव,
ता. वैजापूर, जि. संभाजीनगर