तू दिवा आहेस
तर मी वात असे
सारे काही मला
नवलाचेच भासे
विचार तुझे नि माझे
कसे बघ जुळतात
न सांगता काळजाची
तार जणू छेडतात
तुझ्या स्पंदनांचा मला
आवाज ऐकू आला
नकळतपणे प्रेमाची
कबुली देऊन गेला
माझ्याही हृदयाची
वाईट अवस्था झाली
जीवाची नुसतीच
घालमेल होत गेली
काही केल्या माझ्या
मनातून तू जाईना
तुझ्याशिवाय मला
मिनिटभरही करमेना
वर्णू कशी मी आता
मनातील भावना
शब्द आहेत अबोल
तूच समजून घेणा
माझ्या आयुष्याची
सुरुवात नव्याने झाली
काय सांगू तू अशी
किमया न्यारी केली
असलास दूर कितीही
माझ्यापासून तू जरी
माझा होऊन राहीलास
तू जसा माझ्या उरी
आठवणीने तुझ्याच रे
जीव व्याकूळ झाला
काही न सांगता तो
तुला भेटून आला
तुझ्या माझ्यातील अंतर
कायमच संपवायचं आहे
माझ्या मनातलं वादळ
तुलाच सांगायचं आहे
सौ. प्रिती सुरज भालेराव, पुणे