मानवाचे मानवतेशी
नाते आता तुटले आहे
सत्तेच्या लोभा साठी
युद्ध आता पेटले आहे
दिला उपदेश बुद्धाने शांतीचा
अहंकारी सर्व विसरले आहे
वाढविण्या सीमा देशाच्या
निष्पाप जीवांना भक्षले आहे
भीतीने जीव झालीत सैरवैर
जीवन तयांचे विस्कटले आहे
अस्त्र शस्त्राच्या प्रहाराने
गर्भ धरणीचे ही जळले आहे
विझवणे जमेल का कुणाला
वनवे बालमनी जे पेटले आहे
होईल का सुटका त्या जीवांची
अग्नीत युद्धांच्या जे गुंतले आहे
कधी येणार का परतून घरट्यात
युद्धभूमीवर जे प्राणपखेरू उडले आहे
येवो परिणाम काही ही युद्धाचे, परतून येतील का
मैदानात लढता लढता जग ज्यांनी सोडले आहे
पुनम सुलाने,जालना