आम्ही भारतीय लोक

सिध्देश्वर दिलीप वायाळ लिखित मराठी कविता आम्ही भारतीय लोक

आम्ही भारतीय लोक

विविध जाती, विविध पंथ,
विविध भाषा, संस्कृती अनेक,
वेगवेगळी फुले मात्र गंध एक,
आम्ही आहोत भारतीय लोक...

प्रत्येक धर्माचा वेगळा झेंडा,
देव देवता असे वेगवेगळ्या,
सर्वांना मात्र तिरंगाच प्यारा,
आम्ही आहोत भारतीय लोक...

प्रार्थना वेगळी,नमस्कार वेगळा,
अर्चना असे प्रत्येकाची वेगवेगळी,
सर्वांसाठी संविधान मात्र एक,
आम्ही आहोत भारतीय लोक...

आता उरले नाही पूर्वीचे मतभेद, 
अनेक खेळ खेळतो आम्ही सोबत,
मानवतेचा मंत्र मानतो श्रेष्ठ,
आम्ही आहोत भारतीय लोक...

देश माझा,मी देशाचा,
हाच आमचा नारा एक,
देशांचा आम्हा आहे अभिमान,
आम्ही आहोत भारतीय लोक...

Sidheshwar vayal

 सिध्देश्वर दिलीप वायाळ,
मु- सावरखेडा (गों), पो सिपोरा (अं), 
ता.जाफ्राबाद,जि.जालना.
मो.नं. ९९२२४६२९०९.