सुस्वागतम - २०२३

संदीप प्रभाकर कुलकर्णी यांनी नववर्षाभिनंदन 2023 आधारित लिहिलेली कविता सुस्वागतम - २०२३

सुस्वागतम - २०२३

मोहक भेट आठवणींची 
देऊन आपल्या हाती 
काळाच्या अनंत पटात 
निघून गेला आपला सोबती !

त्यानं पाठवलंय नव्याला 
वर्षभर सोबत द्यायला 
मी - तुम्ही - सारे आपण 
आहोतच की अनुभवायला !

बघूया सापडतं का ते 
जे काही हरवलं होतं
होईल का सफल सारं ते 
जे काही ठरवलं होतं...! 

नक्की सांगता नाही यायचं 
पण सारे राहूया आनंद सुखात 
डोळ्यातल्या स्वप्नांच्या साथीनं 
पुन्हा २०२३ या नव्या वर्षात...!

Sandeep Prabhakar Kulkarni

।। नववर्षाभिनंदन ।।
-----------
- संदीप प्रभाकर कुलकर्णी, औरंगाबाद. 
@ 98508 26679