काय आहे पैसा
भुताटकी चा तर हा खेळ
ज्याच्यावर बसतो जीवनाचा मेळ,
ज्याला गरज असते त्याला दिसत नाही,
चकव्यासारखा चकवा देतच राही.
ज्याच्याकडे पैसा ठेवायला
जागा नाही, त्याला छप्पर पाडके
मिळतच राही.ज्याचाकडे
नाही पैसा त्याला हो कसला
आला आदर,मोठेपणा, मान.
पैशाच्या गंजीवर,
खेळणाऱ्यांना मोठेपणा
देण्यासाठी ठेवु गहाण
पैश्यावरच चालणारी दुनिया आली सारी,
पैश्यानेच बनते का जीवन लयभारी.
पैश्याने सगळे विकत घेता येत नाही,
हे सत्य आहे पैसा आज आहे तर उद्या नाही.
फुकटचा पैसा काहीना सहज पचतो,
कष्टकऱ्याचा घाम नेहमी जिरतो.
पैश्याने सगळं येऊ शकते
पण प्राण, आई-वडील, जिद्द
संस्कार, माणुसकी ही
कधीच विकत घेता येत नाही.
सौ. स्मिता संभाजी राऊत