कोण म्हणते कविता करावी..?

 श्रीमती . राजश्री आडे लिखित मराठी कविता कोण म्हणते कविता करावी..?

कोण म्हणते कविता करावी..?

कोण म्हणते.. कविता करावी..?
शब्द शब्द मांडून व्यक्त व्हावी..

नाही तसे काही.. कधी कधी कविता ...
नजरेतून पहावी... आणि नजरेतूनच व्यक्त व्हावी...

तुला जाणवले तेच मला समजावे ....
इथपर्यंत अंतरंगाचे सुत जुळावे..

भेदून सारे शब्द... अबोल.. तू आणि मी व्हावे...
पाऊस पडावा.. दव ही व्हाव...

उन्ह झेलत झुळूक होऊन...
रेशमी केसात गुरफटत जावे...

तू पहिल्या पावसाच्या मृदगंधमध्ये मला शोधावे...
मी वादळात तुझी वाट पहावी...

कोण म्हणते कविता करावी?
तू सृष्टीचे नवनिर्मितीचे सौंदर्य पाहून ..

अचंबित होऊन नाचावे...
मी तो अंकुर माझ्यातच वाढवावा...

तु कुंचला घेवून तूझ्या प्रतिभेने रंग भरावे
मी साक्षात ती प्रतिमा व्हावी..

तु सर्व काही शोधत असताना.. निर्वाण हे शोधावे...
आणि ते तुला माझ्या 'कलेवर ' प्राप्त व्हावे..

कोण म्हणते कविता करावी..?
शब्द शब्द मांडून व्यक्त व्हावी..?

Rajashree Aade

 श्रीमती . राजश्री आडे,
(वरिष्ठ पोलिस निरीक्षक)
पोलिस स्टेशन दौलताबाद
औरंगाबाद शहर